Site icon सक्रिय न्यूज

कांही सेकंदात कळणार कोरोना टेस्टचा निकाल…….!

कांही सेकंदात कळणार कोरोना टेस्टचा निकाल…….!

मुंबई दि.७ – सध्या देशात कोरोनाचं निदान करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. पण आता आता काही सेकंदात कोरोना चाचणीचा निकाल कळू शकणार आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केंद्र सरकारकडे इस्रायलच्या टीमला भारतात बोलावण्यासाठी विशेष परवानगी मागितली आहे. इस्राईल हा देश नुकताच ‘कोरोनामुक्त देश’ जाहीर झाला आहे.

इस्राईलची टीम भारतात येऊन रॅपिड कोविड 19 आयडेंटिफिकेशन सोल्युशनची स्थापना करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने इस्त्रायली स्टार्टअप कंपनी ब्रॅथ ऑफ हेल्थकडून 1.5 कोटी डॉलर्सचे आयडेंटिफिकेशन सोल्युशन खरेदी केले आहे. त्यामुळे भारतात कोरोना चाचणी सोपी आणि वेगवान होणार आहे. भारतात आल्यावर ही इस्त्रायली टीम भारतीयांना प्रशिक्षण सुद्धा देणार आहे.

दरम्यान इस्त्रायल सरकारने आपल्या नागरिकांना सध्या भारतात येण्यास आणि जाण्यास बंदी घातली आहे. असं असताना देखील ब्रॅथ ऑफ हेल्थला रिलायन्सशी सौदा करण्यास परवानगी दिली गेली आहे. कोरोना कॅरिअर आणि रुग्णांना ओळखणारी ही प्रणाली देशात संक्रमणाची गती कमी करण्यात उपयुक्त ठरू शकते, असं सांगितलं जात आहे. या माध्यमातून कोरोना चाचणीचे निकाल काही सेकंदात मिळणार आहेत.

 

शेअर करा
Exit mobile version