Site icon सक्रिय न्यूज

लहान मुलांच्या बाबतीत राज्य सरकार अलर्ट, बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करण्यात येणार – राजेश टोपे

लहान मुलांच्या बाबतीत राज्य सरकार अलर्ट, बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करण्यात येणार – राजेश टोपे

मुंबई दि.७-  कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे, असी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी दिली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हो धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने केली जाईल,” असे राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील गुरूवारी रात्री विविध बालरोग तज्ञांशी संवाद साधला, अशी माहिती टोपे यांनी दिली.

शेअर करा
Exit mobile version