Site icon सक्रिय न्यूज

जिथे आहात तिथेच सुरक्षित बसा, प्रशासनाला सहकार्य करा……!

जिथे आहात तिथेच सुरक्षित बसा, प्रशासनाला सहकार्य करा……!

केज दि.८ – जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कठोर पावले उचलून जिल्ह्यात 12 मे पर्यंत निर्बंध कडक केले आहेत. केवळ आणि केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले असून विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर प्रतिबंध घालण्याचे आदेश आहेत. आणि त्याची सक्त अंमलबजावणी केज शहरात सुरू झाली असून चौकाचौकात पोलीस डोळ्यात तेल घालून येणाऱ्या जाणा ऱ्यांची कसून चौकशी करत दंडात्मक कारवाई करत आहेत.त्यामुळे आपण जिथे असाल तिथेच सुरक्षित रहा अन्यथा खिशात जास्त पैसे झाले असतील तर बाहेर फिरून दंड भरा.

            शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच भवानी चौकात सकाळपासूनच पोलिसांनी कडक शिस्त लावली आहे. येणाऱ्या जाणा ऱ्यांची कसून चौकशी करून ज्यांच्याकडे सबळ कारण नाही अश्या लोकांची धरपकड सुरू केली आहे. यामध्ये बहुतांश लोक साध्या साध्या कामाचे कारण काढून बाहेर फिरत आहेत. मात्र आज अश्या लोकांची वाहने थांबवून 500 रुपये दंड करण्यात येत आहे. तर जे दंड भरणार नाहीत त्यांची वाहने पोलीस ठाण्यात आणून लावत आहेत. त्यामुळे मोकाट फिरणाऱ्या लोकांना चांगलीच अद्दल घडत असून पुन्हा बाहेर येण्याचे धाडस करत नाहीत.
शेअर करा
Exit mobile version