नवी दिल्ली दि.८ – देशभरासह संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यातच सुरुवातीला कोरोनासाठी कोणत्याही प्रकारचं ठोस औषध नव्हतं. मात्र त्यानंतर आता भारतामध्ये दोन लसींचं उत्पादन होत आहे. मात्र अशातच भारत सरकारच्या औषध नियामक संस्थेने डीआरडीओने बनवलेल्या 2 डेक्सोय डी ग्लुकोजच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
भारतातील कोरोना ग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. 2 डेक्सोय डी ग्लुकोजचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येईल, असंही डीआरडीओने म्हटलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारपद्धती ऐवजी 2 डेक्सोय डी ग्लुकोजचा वापर पर्यायी उपचार पद्धती म्हणून केला जाईल. या औषधाची निर्मिती डीआरडीओच्या आयएमएस आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी एकत्रितपणे केली आहे. या औषधाच्या चाचण्या केल्या गेल्या तेव्हा याचा डोस घेतलेल्या रुग्णांमध्ये याची सकारात्मक लक्षण दिसून आली आहेत. रुग्णांचा बरा होण्याचा वेग चांगला असून ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होतं, असंही डीआरडीओकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, डीआरडीओनं विकसित केलेलं हे औषध पावडर स्वरुपात मिळतं. हे पाण्यामध्ये टाकून घ्यावं लागते. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींमधील विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासोबत संसर्ग रोखण्याचं काम करत. त्यासोबतचं रुग्णाच्या शरीरातील उर्जा वाढवण्याचंही काम करत असल्या