Site icon सक्रिय न्यूज

कोरोनातून बाहेर पडल्यानंतर लगेचच टूथब्रश बदला…….!

कोरोनातून बाहेर पडल्यानंतर लगेचच टूथब्रश बदला…….!

मुंबई दि.८ – तुम्ही कोरोना आजारातून नुकतंच बाहेर पडला असाल आणि घरी आराम करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोरोना आजारातून बाहेर पडल्यानंतर लगेच तुम्ही तुमचा टूथब्रश चेंज करा. कारण कोरोनाचा पुन्हा संसर्ग रोखण्यास त्याला मदत होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे. याशिवाय अनेक कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये देखील हे काटोकोरपणे पाळलं जात आहे. काही ठिकाणी रुग्णांना टूथब्रश दिला जातो. त्यानंतर ज्यादिवशी त्यांना डिस्चार्ज मिळतो त्यादिवशी त्यांना दुसरा टूथब्रश दिला जातो. त्यामागे महत्त्वपूर्ण कारण आहे. कोरोनाचा पुन्हा संसर्ग होऊ नये, हे त्यामागील महत्त्वाचं कारण आहे.

एखाद्या व्यक्तीने नुकतीच कोरोनावर मात केली. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून तो घरी आला असेल तर त्याने तातडीने आपला टूथब्रश बदलावा. यामुळे फक्त त्याच्यासाठीच पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका कमी होणार नाही तर त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल. अनेक घरांमध्ये तर एकच वॉशरुम असतं. त्यामुळे कोरोनातून बाहेर आल्यानंतर टूथब्रश बदलला तर अशा घरांमधील सदस्यांना कोरोना संसर्ग होणार नाही, असं तज्ज्ञ सांगतात.

दरम्यान कोरोनातून बाहेर पडल्यानंतरही ज्या लोकांना खोकला, सर्दी आणि ताप येत असेल अशा व्यक्तींनी तर आपला टूथब्रश नक्की बदलावा. अशा नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या 20 दिवसांनंतर टूथब्रश आणि टंग क्लिनीर बदलावं, असं तज्ज्ञ सांगतात. तसेच टूथब्रशला बॅक्टेरिया फ्री ठेवायचं असेल तर ओरल हायजीन ठेवणं जास्त जरुरीचं आहे, असा सल्ला देखील तज्ज्ञांकडून देण्यात येतोय.

शेअर करा
Exit mobile version