Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यासाठी 3300 लसीचे डोस…….!

केज तालुक्यासाठी 3300 लसीचे डोस…….!
बीड दि.९ – कोविड १९ महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हयात कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. केज तालुक्यात ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांसाठी 3300 लससाठा प्राप्त होणार असून प्रत्येक प्रा.आ. केंद्रांस ४०० डोसेस याप्रमाणे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये केज उपजिल्हा रुग्णालयासाठी 700, नांदूरघाट साठी 200 तर तालुक्यातील आडस, बनसारोळा, विडा, युसुफ वडगाव, राजेगाव, चिंचोली माळी या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी 400 डोस उपलब्ध होणार आहेत. तरी ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांनी सोमवारी दि. १०/५/२०२१ रोजी प्रा.आ. केंद्रांत जाउन नोंदणी करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी केले आहे.
         तसेच १८ ते ४४ वर्ष वयाच्या नागरीकांसाठी कोविड लसीकरण सत्र तालुकाच्या ठिकाणी सुरु असुन या वयोगटाकरीता ८७०० लससाठा प्राप्त होणार असुन दररोज २०० डोसेस या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. १८ ते ४४ वर्ष वयाच्या नागरीकांसाठी मंगळवार दि. ११/५/२०२१ पर्यंतची नोंदणी झाली असुन दि. १२/५/२०२१ पासुनच्या लसीकरणा करीता सोमवार १०/५/२०२१ रोजी सांयकाळी ६ वाजता नोंदणी करता स्लॉट ओपन होणार आहे. सांयकाळी ६ वाजेनंतर १८ ते ४४ वर्ष वयाच्या नागरीकांनी नोंदणी करुन अपॉइंटमेट नुसार लसीकरण करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले असुन कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
शेअर करा
Exit mobile version