नवी दिल्ली दि.11 – प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही योजना 2016 मध्ये सुरु करण्यात आली होती. मात्र, मधल्या काळात ही योजना बंद केली होती. आता नव्यानं ही स्कॉलरशिप योजना सुरु करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती घेण्यासाठी माजी सैनिकांची मुलं अर्ज करु शकतात. पात्र विद्यार्थी ऑफिशियल वेबसाईट ksb.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात.
प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 योजनेसाठी पात्र विद्यार्थी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करु शकतात . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसठी प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 सुरू की है. या स्कॉलरशिप योजनेचा (Government Scholarship Scheme) उद्देश विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. केंद्र सरकार या स्कॉलरशिप योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देते. केंद्र सरकारद्वारे माजी सैनिक आणि कोस्ट गार्डमधील निवृत्त झालेले जवान यांना शिष्यवृत्ती देते.
अर्ज कसा करायचा?
प्रधानमंत्री स्कॉलरशिप स्कीम 2021 साठी अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, तिथे PMSS (PM Scholarship Scheme) वर क्लिक करा आणि आता New Registration वर क्लिक करा, त्यानंतर Apply Online वर क्लिक करा, रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये माहिती भरा, अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पीएम किसान स्कॉलरशीप योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड असणं आवश्यक आहे. याशिवाय त्याच्या नावानं असलेल्या बँक खात्याच्या पासबूकची झेरॉक्स प्रत, जन्म प्रमाणपत्र आणि गुणपत्रक आवश्यक आहे.प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना 12 वीला 75 टक्केपेक्षा अधिक गुण मिळतील त्यांना 10 महिने दरमहा 1 हजार रुपये दिले जाणार आहेत.
दरम्यान 12 वी उत्तीर्ण आहेत पण शिक्षण सुटलेले आहे अशा माजी सैनिकांच्या पाल्यांना या योजनेतून शिक्षण घेता येईल. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चार ते पाच वर्षांसाठी 2 हजार रुपये दिले जातील. मात्र, विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रतेयक विषयात 50 टक्केंपेक्षा अधिक गुण मिळवावे लागतील. प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 अंतर्गत जे विद्यार्थी 85 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवतील त्यांना 25 हजार रुपये दिले जाणार आहेत.