केज दि.12 – युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात यांच्याकडे एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असणारे अभियंता बंधु व देशाच्या सीमेवर तैनात असणारे फौजी बंधु यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त निराधार वृद्धांना मदत करावी यासाठी काही रक्कम सुपुर्द केली होती.तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कार्यरत असलेले मित्र श्रीमंत कोठावळे व एम एस एफ मध्ये कार्यरत असलेले मित्र हनुमान यादव यांनीहि सहकार्य केले.या सर्वांच्या सहकार्याने “जमा झालेली रक्कम कुठेच दान न करता किंवा इतर कोणाकडे सुपुर्द न करता “त्या रक्कमेचा सदुपयोग व्हावा यासाठी युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात व युवासेना शहरप्रमुख तात्या रोडे यांनी परळी वैजनाथ येथील मंदिरा बाहेर असलेल्या निराधार मनोरुग्ण लोकांना मदत करण्याचं ठरवलं.
केजमधुन त्यांनी कुर्ता, पॅंन्ट, लुगडे, साड्या, मास्क, सॅनिटायजर, पाणी, बाॅटल, हॅण्डवाॅश, मेडीसीन, बिस्किट व जेवण घेऊन जाऊन परळी वैजनाथ येथील मंदिरा समोर जाऊन वास्तव्यास असलेल्या अनाथ,वृद्ध,अपंग व निराधार लोकांमध्ये वाटप केले.यावेळी नवे कपडे मिळाल्याने ती सगळी लोक खुप आनंद व्यक्त करत होती तर कोणी नाचत होतं.
यावेळी सर्व कपडे,वस्तु देताना युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात,शहर प्रमुख तात्या रोडे,नारायण इटकर, एमएसएफचे हनुमान यादव व परळीचे सुशिल मुंडे उपस्थित होते.