संजय गायकवाड यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. संजय गायकवाड यांनी माफी मागतली पाहिजे अन्यथा राज्यातील सर्व वारकरी मंडळी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वारकरी संप्रदायाने दिला आहे. तर तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे. पण मी रोज 20-25 जणांच्या अस्थी जाळू लागलो, तुमच्या लोकांची श्रद्धा आहे हे मला माहितीये, पण मी जे बोललो ते वास्तव आहे. मी पण नास्तिक नाही परंतु काळाची गरज आहे ते बोललो, असं संजय गायकवाड म्हणाले.
दरम्यान, कोरोनाकाळात मंदिरंही बंद आहेत. देव पण लॉक करण्यात आले आहेत. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. स्वत:ची काळजी स्वत:लाच घ्यायची आहे. त्यामुळे उपास तापास बंद करा, रोज 4 अंडे खा. एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटिनयुक्त भरपूर खा असा सल्ला संजय गायकवाड यांनी लोकांना दिला आहे. काही दिवसांपूर्वी मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते, असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं.