Site icon सक्रिय न्यूज

‘या’ लोकांना म्युकरमायकोसिसचा धोका अधिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केल्या तीन मागण्या…..!

‘या’ लोकांना म्युकरमायकोसिसचा धोका अधिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केल्या तीन मागण्या…..!

मुंबई दि.13 – महाराष्ट्रात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. अशात राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराने शिरकाव केला आहे. म्युकरमायकोसिस संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे 1 हजार 500 पेक्षा जास्त रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी म्युकरमायकोसिस बाबत केंद्र सरकारकडे तीन मागण्या केल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.महाराष्ट्रातील म्युकरमायकोसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा कोटा वाढवून द्यावा. तसंच या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात यावेत. एम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची किंमत 6 हजाराच्या आसपास आहे. एका रुग्णाला 20 – 20 इंजेक्शन्स द्यावी लागत आहेत. अशावेळी इंजेक्शन्सची किंमत कमी करावी अशी आग्रही मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं.

दरम्यान ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती विविध कारणांमुळे कमी झाली आहे. तसंच ज्या रुग्णांच्या रक्तात आयर्न म्हणजेच फेरेटिनचं प्रमाण जास्त आहे, अशा रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

शेअर करा
Exit mobile version