केज दि.१३ – तालुक्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षणीय वाढत आहे.परंतु त्या प्रमाणात लक्षात शासनाकडून औषधी वेळेवर मिळत नाहीत. सदरील बाब अनिरुद्ध शिंदे, महादेव सुर्यवंशी, सुनील घोळवे, राहुल गदळे, अतुल इंगळे, सुरेश थोरात, सुरेश नांदे यांच्या लक्षात आली व लागलीच निर्णय घेऊन अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त एक लक्ष रुपयांची औषधी खरेदी करून जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते केज रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी अनिरुद्ध शिंदे, महादेव सुर्यवंशी, सुनील घोळवे, राहुल गदळे, अतुल इंगळे, सुरेश थोरात, सुरेश नांदे, भास्कर सुर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास आठवले, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. करपे, डॉ. इंगोले, डॉ. सावंत व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.