Site icon सक्रिय न्यूज

लसीकरणा संदर्भात बीड प्रशासनाची महत्वाची सूचना…….!

लसीकरणा संदर्भात बीड प्रशासनाची महत्वाची सूचना…….!
बीड दि.15 – कोविड-१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हयात कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्हयात पुढील आदेशापर्यंत फक्त ४५ वर्षांवरील नागरीकांसाठी Covishield व Covaxin लसीचा दुसरा डोस देण्याची कार्यवाही सुरु आहे. Covishield लसीचा दुसरा डोस पहिल्या डोस नंतर १२ आठवडे
ते १६ आठवडे दरम्यान घ्यावा.तर 4  आठवड्यानंतर Covaxin लसीचा दुसरा डोस केंव्हा घ्यावा.
                         जे नागरीक उपरोक्त सुचनेनुसार दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असतील त्यांनी तसेच ४५ वर्षे वया वरील प्रथम डोस घेण्यास ईच्छुक नागरीकांनी http:ezee.live/Beed covid19-reistration या लिंकवर क्लीक करावे. क्लीक केल्यावर कोविड १९ लसीकरणासाठी नोंदणी फॉर्म उघडेल. यामध्ये ज्यांना लस घ्यावयाची आहे त्यांचे संपुर्ण नाव, वय, अचुक मोबाईल नंबर लिंग व संपुर्ण पत्ता नोंद करावा. त्यानंतर आपणास ज्या लसीकरण केंद्रामध्ये लस घ्यावयाची आहे त्या लसीकरण केंद्राचे नाव यादीमधुन निवडावे व आपला डोस निवडावा व त्यामध्ये दिलेला capcha टाकावा नंतर जी व्यक्ती हा फॉर्म भरत आहे त्याचा मोबाईल नंबर टाकावा व फॉर्म सादर करावा. आपण फॉर्म सादर केल्यानंतर आपणास त्या लसीकरण केंद्रांसाठी आपला टोकन नंबर येईल सदर टोकन नंबरचा स्क्रिनशॉट जपुन ठेवावा. माहीती भरताना अचुक मोबाईल नंबर टाकणे आवश्यक आहे. चुकीचा मोबाईल नंबर भरल्यावर आपणस संपर्क साधणे शक्य होणार नाही. अशाप्रकारे नोदंणी केल्यानंतर आपण नोदंणी केलेल्या मोबाईल नंबरने मोबाईल मध्ये Needly app install करुन रजिस्टर केल्यास आपणाला त्या app मध्ये टोकनचे स्टेटस बघता येईल. टोकन क्रंमाक व उपलब्ध लस साठयानुसार नागरीकांना SMS / Call करुन लसीकरणासाठी बोलावण्यात येईल. संदेश आल्यानंतरच नागरीकांनी लसीकरणासाठी येणे आवश्यक आहे. त्या दिवशी जर त्यांना येणे शक्य झाले नाही तर त्यांचा प्रतिक्षा यादीतील क्रमांक जाईल व पुनश्च नोदंणी करून टोकन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा लागेल. प्रतिक्षा यादीतील लसीकरणा करीता बोलावण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या व्यतिरीक्त इतर नागरीकांनी लसीकरण केंद्रांवर येवु नये.
           तसेच यापुर्वी प्राथमिक आरोग्य केंदावर येवुन रजिस्टर मध्ये नोंदणी व प्रतिक्षा यादी तयार करण्याची पध्दती आता बंद करण्यात येत आहे. यापुढे ४५ वर्षे वयावरील नागरीकांना प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर न जाता घरबसल्या लसीकरणासाठी नोंदणी करता येणार असुन प्रतिक्षा यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केल्या जाणार आहे व भविष्यात उपलब्ध होणा-या लसींच्या संख्येनुसार टोकन नंबरच्या क्रमांकानुसार त्यांचा नंबर आल्यावर sms/call माध्यमातुन लसीकरणासाठी बोलावण्यात येणार आहे. हि व्यवस्था फक्त ४५ वर्षावरील प्रथम व दुसरा डोस साठी लागु राहिल. ज्यांचेकडे Android mobile नाहित अशा व्यक्तींना इतर कोणत्याही व्यक्तींकडुन नोंदणी करून घेता येईल.
 वर नमुद केल्यानुसार नोंदणी केल्या नंतर जिल्हास्तरावर लस प्राप्त झाल्यानंतर (sms/call) द्वारे बोलविण्यात येईल. केंद्रावर आल्यानंतर आपण लसीकरणाच्या मागदर्शक सुचनांनुसार पात्र असाल तरच लसीकरण करण्यात येईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे आपण लसीकरणासाठी पात्र असाल तरच नोंदणी करावी. १८ ते ४४ या वयोगटाचे लसीकरण मात्र cowin app वर self registration करुन Online Appointment घेतल्यानंतरच करण्यात येईल. त्यांच्यासाठी प्रतिक्षा यादीची सुविधा असणार नाही, हयाची नोंद घ्यावी तरी यापुढे नागरीकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी टाळावी व दिलेल्या दिवशी, दिलेलया वेळेत लसीकरण केंद्रांवर यावे असे आवाहन जिल्हा प्रशासना कडून करण्यात येत आहे.
शेअर करा
Exit mobile version