Site icon सक्रिय न्यूज

ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना लुटले, केज बीड रोडवरील सांगवी पाटीजवळील घटना……!

ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना लुटले, केज बीड रोडवरील सांगवी पाटीजवळील घटना……!
केज दि.१६ – अमोल ट्रॅव्हल्सच्या (एम. एच.२३ए.यू.२९०७) डिकीतून प्रवास करणाऱ्या ३ प्रवाशांकडील ऐवज २ चोरट्यांनी लंपास केला. केज तालुक्यातील सांगवी पाटीनजीक १४ मे रोजी पहाटे दीडच्या सुमारास घडली. प्रशांत दादाराव मिसाळ (रा. फुले नगर, केज) यांच्या बॅगेतील घड्याळ, बँक पासबुक, एटीएम कार्ड व पुस्तके असा १० हजारांचा ऐवज, विजय पंडित बिडवे (रा. बंकट गल्ली, अंबाजोगाई) यांच्या बॅगेतून दीड तोळे सोन्याचे गंठण, चार शर्ट, पॅन्ट जोड असा ६५ हजारांचा ऐवज, अक्षय दादाराव चेवले (रा. सिडको नांदेड) यांचा ५ हजारांचा मुद्देमाल असा एकूण ८० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ट्रॅव्हल्स चालक वसंत ढवळे (रा. धनगरजवळका ता.पाटोदा) यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध केज ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version