Site icon सक्रिय न्यूज

राजीव सातव यांचं निधन सायटोमॅजिलो विषाणुमुळे……? काय आहे हा विषाणू….?

राजीव सातव यांचं निधन सायटोमॅजिलो विषाणुमुळे……? काय आहे हा विषाणू….?

पुणे दि.१६ – काँग्रेसचे नेते व राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचं आज सकाळी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दुर्दैवी निधन झालं. सातव यांच्या शरीरामध्ये एक नवा सायटोमॅजिलो नावाचा व्हायरस आढळून आला होता. याबद्दलची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. हा व्हायरस नेमका काय आहे ते जाणून घेऊया.

सायटोमॅजिलो हा व्हायरस रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये अधिक वेगाने सक्रिय होतो. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणाऱ्यांवर हा व्हायरस तेवढ्या प्रमाणात प्रभाव करू शकत नाही. तसेच त्यांना याचा धोका देखील नसतो. सायटोमॅजिलो हा विषाणू तसा सर्वसाधारण आहे. तसेच अमेरिकेतील 40 वर्ष पूर्ण असलेल्या 50 टक्क्यांहून अधिक लोकांच्या शरीरात हा विषाणू आढळून येतो. या विषाणूने संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना लाळ किंवा थुंकीद्वारे त्याचा प्रसार होत असतो. डोके दुखणे, ताप येणे तसेच श्वास घेताना त्रास होणे अशी या विषाणूची प्राथमिक लक्षणं आहेत. रक्त तपासणी केल्यानंतर हा विषाणू शरीरात आहे की नाही हे तपासले जाऊ शकते. हा विषाणू लहान मुलांमध्ये देखील आढळून येतो तसेच गरोदर महिलांनाही या विषाणूचा संसर्ग होतो.

दरम्यान रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना या विषाणूचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. या विषाणूमुळे चेहऱ्यावर किंवा तोंडाच्या आतल्या भागात आणि ओठावर फोडं देखील येतात. खासदार राजीव सातव यांची दोन दिवसापूर्वी कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती. त्यामुळे कोरोनाने नाही तर या व्हायरसमुळे कदाचित त्यांचं निधन झालं असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेअर करा
Exit mobile version