Site icon सक्रिय न्यूज

यामुळेच लसीकरण आहे महत्वाचे……..!

यामुळेच लसीकरण आहे महत्वाचे……..!

बीड दि.१६ – लसीकरणाचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोना संक्रमणापासून अधिक सुरक्षित होऊ शकतो, असं रुग्णालयाच्या अभ्यासातून समोर आलं आहे. इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयानं शनिवारी लस घेतलेल्या लोकांवरील आपला अहवाल प्रसिद्ध केला. संशोधनानुसार, लस घेतलेले 97.38 टक्के लोक कोरोना संक्रमणापासून सुरक्षित आहेत. फक्त 0.06 टक्केंना कोरोनामुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.

नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाला आपल्या संशोधनात असेही दिसून आलं आहे की, लस घेतल्यानंतर प्राथमिक स्वरुपाचं संक्रमण होतं. लस घेतल्यानंतर आयसीयूमध्ये भर्ती अथवा मृत्यू होण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. दिल्लीतील आरोग्य कर्मचाऱ्यांवर इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयानं संशोधन केलं होतं. इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाने 3,235 आरोग्य कर्मचार्यांवर संशोधन केलं. यामधील 85 जणांना कोरोनाचं संक्रमण झालं. यामधील 65 म्हणजेच 2.65 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण झालं होतं. तर 20 जणांनी फक्त पहिला डोस घेतला होता. प्रभावित होणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे.

दरम्यान इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाच्या या संशोधनाला एका पीअर-रिव्यूड मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्याची तयारी सुरु आहे. अपोलो हास्पिटल समूहाचे मेडिकल डायरेक्टर आणि सीनियर कंसल्टेंट डॉक्टर अनुपम सिब्बल म्हणाले की,’ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. यामध्ये लसीकरणांनतर कोरोना संक्रमणाची संख्या जास्त आहे. लसीकरणानंतर रोग प्रतिकारक शक्ती वाढत नाही. मात्र, कोरोनाच्या गंभीर लक्षणांपासून नक्कीच सुरक्षित ठेवते.

शेअर करा
Exit mobile version