Site icon सक्रिय न्यूज

केज शहरातील 17 दुकानदारांकडून ४१ हजाराचा दंड वसूल……..!

केज शहरातील 17 दुकानदारांकडून ४१ हजाराचा दंड वसूल……..!

केज दि.१६ – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. केजमध्ये नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडणाऱ्या एका आडत दुकानासह १७ दुकानदारांकडून ४१ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

केज शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार दुलाजी मेंडके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे रस्त्यावर फिरून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडी दिसताच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहेत. महसूल, पोलीस आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक दुकानावर करडी नजर ठेवून आहे. शनिवारी नियमांचे उल्लंघन करून दुकान उघडणाऱ्या ६ दुकानदारांकडून १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर रविवारी पोलीस निरिक्षक प्रदिप त्रिभुवन, पोलीस नाईक अशोक नामदास, नगरपंचायतीचे स्वच्छता निरिक्षक असद खतीब, आयुब पठाण, अतिक सय्यद, आझाद शेख यांच्या ११ दुकाने उघडी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी एका आडत दुकानदाराकडून १० हजार रुपये व इतर १० दुकानदारांकडून १३ हजार १०० रुपये असा २३ हजार १०० रुपये दंड वसूल केला.

शेअर करा
Exit mobile version