केज दि.१७ – बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिनांक 15/05/2021 रोजीचे रात्री 12.00 वाजले पासुन ते दि. 25/05/2021 रोजीचे रात्रीचे 12.00 वाजेपर्यंत बीड जिल्हयात लॉकडाऊन घोषित केलेला आहे. तसेच मुख्य कार्यकारी जि.प बीड यांनी सदर लॉकडाऊनची बीड जिल्हयातील ग्रामीण भागात कडक अंमलबजावणी करण्या करिता आवश्यक त्या उपयायोजना करणे बाबत आदेश केलेले आहे. त्या अनुषंगाने केज तालुक्यातही ग्रामीण भागातही लॉक डाउन ची कडक अंमलबजावणी करण्यासाठी गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांनी सहा पथकांची नेमणूक केली आहे.
केज तालुक्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबाजवणी करण्या करिता खालील 06 फिरत्या पथकांची स्थापना करण्यात आली असुन पथकामध्ये पथक प्रमुख म्हणून श्रीमती एस.बी.लटपटे, एम.जी.चौधरी, पी.एस.साखरे, व्ही. वरपे, एम.एस.चव्हाण, एस. ए. पटेल यांची होळ, युसुफ वडगाव, आडस, नांदूर घाट, विडा, चिंचोली माळी इत्यादी सर्कल साठी नेमण्यात आले आहेत. तर त्यांना सहाय्यक पण देण्यात आले आहेत. पथकातील कर्मचाऱ्यांनी दिनांक 15/05/2021 पासून त्यांना देण्यात आलेल्या जि.प गटातील प्रत्येकी ग्रामपंचायतीनां (दैनंदिन किमान 5 ग्रामपंचायत ) भेट देऊन व प्रत्येक ग्रामपंचयतीमध्ये प्रत्येकी 2 तास थांबुन कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होत असले बाबत खात्री करायची आहे. तसेच लॉकडाऊन मध्ये परवानगी नसलेल्या आस्थापना, किरणा दुकाने बंद राहतील तसेच नागरीक अनावश्यकरित्या घराचे बाहेर पडत नसल्याचे / विनाकारण गावामध्ये फिरत नसले बाबत खात्री करायची आहे.
लॉकडाऊनचे उल्लंघन करण्याच्या व्यक्तीनां दंड करणे तसचे आवश्यकता भासल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणे इ. कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदरील मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पथकांनी भेटी दिलेल्या गावांचे अक्षांश-रेखाशं दिनांक व वेळ नमुद असलेले फोटो ग.वि.अ यांचे वॉटसअप वर दैनंदिन रात्री 9 वाजेपर्यंत पाठवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.