Site icon सक्रिय न्यूज

जीवे मारण्याची धमकी देऊन पळवून नेले होते…….!

जीवे मारण्याची धमकी देऊन पळवून नेले होते…….!
केज दि.१७ – तालुक्यातील १९ वर्षीय विवाहितेस जीवे मारण्याची धमकी देत पळवून नेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात दोघा विरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना न्यायालयात हजर केले केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
            तालुक्यातील एका १९ वर्षीय विवाहितेस बंडू राजाभाऊ चौरे रा. जिवाचीवाडी व सहदेव आश्रुबा आंधळे रा.आंधळ्याचीवाडी यांनी जीवे मारण्याची धमकी देत गाडीवर बसवून कराड तालुक्यातील मल्हार पेठ येथे  नेऊन एका खोली मध्ये ठेऊन ती गरोदर असल्याची माहिती असताना हि तिच्या इच्छे विरुद्ध  तिच्यावर बंडू राजाभाऊ चौरे याने अत्याचार केला. सदरील घटना दिनांक १ मे २०२१ ते १६ मे  २०२१ च्या दरम्यान घडली.
                        दरम्यान पीडितेच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात बंडू राजाभाऊ चौरे  व सहदेव आश्रुबा आंधळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपीना केज पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version