Site icon सक्रिय न्यूज

दहा दिवस ते दोन आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात येईल……! 

दहा दिवस ते दोन आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात येईल……! 

नवी दिल्ली दि.18 – कोरोनाच्या संसर्गाचं थैमान जगभरात सुरु असताना कोरोनाचे नवीन स्ट्रेन आढळत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. अशात एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. कोरोनाची ही लाट कधीपर्यंत राहील या प्रश्नाचं उत्तर सफदरजंग रुग्णालयातील कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक आणि मुख्य डॉक्टर जुगल किशोर यांनी दिलं आहे.

सगळं काही व्यवस्थित घडलं तर कोरोनाची दुसरी लाट कमाल दहा दिवसांपासून ते दोन आडवड्यांदरम्यान संपुष्टात येईल, अशी शक्यता डॉ. जुगल किशोर यांनी वर्तवली आहे. तसेच लसीकरणाचा वेग वाढवला आणि अधिकाधिक लोकांचं लसीकरण केलं तर आपण या लाटेला वेळेवर थोपवण्यात यशस्वी ठरू, असं जुगल किशोर म्हणाले. आपण सर्वांनी कोविडबाबतच्या नियमांचं कठोरपणे पालन करावं आणि या विषाणूला रोखण्यासाठी आपली भूमिका पार पाडावी. मात्र जर रस्त्यांवर लोकांची गर्दी कायम राहिली. बाजारात वर्दळ राहिली तर कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचा कालावधी तेवढाच अधिक प्रमाणात वाढेल. याशिवाय लसीकरणाचा वेग वाढवला आणि अधिकाधिक लोकांचे लसीकरण केलं तर आपण या लाटेला वेळेवर थोपवण्यात यशस्वी ठरू, असं डॉ. जुगल किशोर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सक्रिय रुग्णांच्या संख्येत जसजशी घट होईल तसतसा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोपही कमी होईल. लस मिळाल्याने या विषाणूला पसरण्यापासून रोखता येऊ शकेल, असं जुगल किशोर यांनी म्हटलं आहे.

शेअर करा
Exit mobile version