Site icon सक्रिय न्यूज

केज शहरातील नऊ हातभट्ट्या उध्वस्त…..!

केज शहरातील नऊ हातभट्ट्या उध्वस्त…..!
केज दि.१८ – पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी शहरातील नऊ हातभट्ट्यावर धडक कारवाई करत शेकडो लिटर रसायन, हटभट्टीची दारू आणि साहित्य असे मिळून ९४ हजार ५०० रु मुद्देमाल नष्ट केला.
                     केज पोलीस स्टेशन हद्दीतील मेन रोड, भवानी माळ आणि क्रांती नगर या ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्ट्या व अवैद्य दारू विक्री यावर कारवाई केली. दोन हाभट्ट्या नष्ठ करण्यात आल्या तर सात ठिकाणी रसायन आणि हात भट्टीची दारू व दारु काढण्याचे साहित्य असे एकून ९४ हजार ५०० रु चा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या पथकात सहाय्यक फौजदार महादेव गुजर, बाळकृष्ण मुंडे, अशोक नामदास, वाहन चालक हनुमंत गायकवाड यांचा सहभाग होता.
               दरम्यान सहायक फौजदार महादेव गुजर यांच्या फिर्यादीवरून शालू नाना पवार, सतीश वसंत काळे, नंदूबाई पवार, सुमनाबाई काळे, सावित्री उत्तम काळे, सुबाबाई हिरा पवार, शहाजी बाजीराव शिंदे, सुबाबाई मुरलीधर काळे, सुरेखा राजेंद्र काळे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शेअर करा
Exit mobile version