Site icon सक्रिय न्यूज

राहुल देशमुख यांच्याकडून केज उपजिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय साहित्याची मदत……!

राहुल देशमुख यांच्याकडून केज उपजिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय साहित्याची मदत……!
केज दि.19 – सध्या कोरोना परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणेसह सर्वच बाबीवर ताण वाढत चाललेला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे औषधांचा व इतर वैद्यकीय साहित्याचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उत्तरदायित्व म्हणून केज शहरातील राहुल राजेसाहेब देशमुख यांनी उपजिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय साहित्याची मदत केली आहे.
                सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राहुल देशमुख यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.बालासाहेब सोळंके यांच्याशी चर्चा करून कमतरता भासत असलेले साहित्य देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार राहुल यांनी
Tab metronidazole400 mg.. 3000, मध्यम साईज चे ग्लोव्हज, 50 लिटर सॅनिटायजर, तसेच Hydrocort 100 mg चे 100 इंजेक्शन डॉ.सोळंके, डॉ.करपे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांच्या या मदतीबद्दल रुग्णालयाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
शेअर करा
Exit mobile version