Site icon सक्रिय न्यूज

बनसारोळा येथील कोविड सेंटरला ११ हजार रुपयांची मदत…….! 

बनसारोळा येथील कोविड सेंटरला ११ हजार रुपयांची मदत…….! 
केज दि.२० – तालुक्यातील बनसारोळा येथील बनेश्वर शिक्षण संस्था संचलित कोविड केअर सेंटरला जय जिजाऊ ॲग्रो प्रोड्युसर कंपनी व प्रल्हाद सप्लायर यांच्या वतीने कोविड रुग्णांच्या सुश्रुषेसाठी मदत म्हणून ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. दैनिक विवेक सिंधुचे संपादक अभिजीत गाठाळ यांच्या हस्ते बनेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष भागवतराव गोरे आणि सचिव डॉ. नरेंद्र काळे यांनी हा धनादेश स्वीकारला.
                    बनेश्वर शिक्षण संस्थेने बनसारोळा येथे कोविड सेंटर सुरु केले आहे. सध्या या कोविड सेंटरमध्ये ४० रुग्ण उपचार घेत आहेत. अतिशय उत्कृष्ट नियोजनासाठी या सेंटरचे सर्वत्र कौतुक होत आहे. तज्ञांच्या देखरेखीखाली सुरु असणारे उपचार, चांगल्या पद्धतीचा आहार, सोबतीला योगाभ्यास यामुळे या सेंटरकडे रुग्णांचा ओढा आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून राहुल गोरे यांनी जय जिजाऊ ॲग्रो प्रोड्युसर कंपनी व प्रल्हाद सप्लायरच्या माध्यमातून या सेंटरला ११ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. गुरुवारी (दि.२०) सदर रकमेचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, नितिन गोरे, गोटु काकडे, विशाल घोरपडे, बापु ठोंबरे, तुकाराम सुवर्णकार आदी उपस्थित होते.
शेअर करा
Exit mobile version