Site icon सक्रिय न्यूज

येत्या एक दोन दिवसांत दहावीच्या परिक्षे संदर्भात निर्णय…….!

येत्या एक दोन दिवसांत दहावीच्या परिक्षे संदर्भात निर्णय…….!

मुंबई दि.21 – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयासंदर्भात पुनर्विचार करण्याचे आदेश देतानाच मुंबई हायकोर्टानी राज्य सरकारची खरडपट्टी काढली आहे. त्यामुळे राज्य सरकार दहावीच्या परीक्षेच्या बाबतीत कोणती भूमिका घेणार याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान येत्या १ ते २ दिवसांत दहावीच्या परीक्षांसदर्भात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत राज्य सरकार गंभीर का नाही? असा सवाल मुंबई होयकोर्टाने राज्य सरकारला केला आहे. दहावीच्या परिक्षांबाबत राज्य सरकार विचार करणार आहे की नाही? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित करत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

                 राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौत्के चक्रीवादाळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांना दहावीच्या परीक्षांसदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे की, गुरुवारी दहावीच्या परीक्षांबाबत मंत्रिमंडळाची बैठक झाली. तेव्हा हा विषय झाला आहे. एक ते दोन दिवसांमध्ये या परीक्षांसदर्भात निर्णय घेण्यात येईल. संबंधित खात्याच्या मंत्रिमहोदयांना, सचिव इतर अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे की, तुमचा अहवाल सादर करा त्या आधारे आपण निर्णय घेतला जाईल. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शेअर करा
Exit mobile version