बीड दि.23 – जिल्ह्यात कोव्हीड 19 कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दैनंदिन कोरोना बाधीत रुग्णसंख्येत मोठया प्रमाणावर वाढ झालेली आहे. कोरोनाच्या दुस-या लाटे दरम्यान लाहन मुले देखील कोरोना बाधित झालेले आहेत. वैद्यकीय तज्ञांनी कोरोना संसर्गाची तिसरी लाट लवकरच येत असल्याची धोक्याची सूचना दिल्या असुन त्यामध्ये लहान मूले जास्त प्रमाणात बाधित होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यासाठी लहान मुलांमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तिस-या लाटेस पूर्ण क्षमतेने तयार होण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी वैद्यकीय तज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लहान मुलांचे कोवीड-19 वरील उपचार, आस. सी. यु. व्यवस्था तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करणेकामी, साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या अधिन राहून बीड जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
सदरील समितीमध्ये डॉ. संभाजी चाटे (अध्यक्ष,बालरोग विभाग प्रमुख स्वारातीग्रावैम अंबाजोगाई),डॉ. राम देशपांडे (सदस्य सचिव, वर्ग 1 बालरोगतज्ञ, जि.रु. बीड), डॉ.अनुराग पांगरीकर (समन्वयक, आयएमए अध्यक्ष, बीड),डॉ. पी. सी. तावडे(सदस्य, आय ए पी अध्यक्ष, बीड), डॉ. सचिन आंधळकर ( सदस्य, बालरोगतज्ञ कुटीर रुग्णालय नेकनुर), डॉ. शंकर काशिद (सदस्य, बाल रोगतज्ञ, जि.रु.बीड), डॉ. रमेश लोमटे (सदस्य, बालरोगतज्ञ स्वारातीग्रावैम, अंबाजोगाई) यांचा समावेश आहे.
दरम्यान सदरील वैद्यकीय तज्ञ जिल्हयातील बालरोग तज्ञ, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी व सर्वेक्षणामध्ये सहभागी कर्मचारी यांना ICMR यांचे प्रोटोकॉलनुसार लहान मुलांचे कोवीड-19 वरील उपचार, आय.सी.यु. व्यवस्था तसेच प्रतिबंधात्मक उपयायोजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
(सुनील भाऊ घोळवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……!)