Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यासाठी 27840 लसीचे डोस उपलब्ध, सोमवार पासून लसीकरणास होणार सुरुवात…..!

बीड जिल्ह्यासाठी 27840 लसीचे डोस उपलब्ध, सोमवार पासून लसीकरणास होणार सुरुवात…..!
बीड दि.23 – कोविड- १९ महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हयात कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.उपलब्ध लस साठयानुसार स्वा.रा.ती. वै.म.व रु अंबाजोगाई येथे १३००, जिल्हा रुग्णालय बीड १३००, उपजिल्हा रुग्णालय गेवराई, परळी, केज येथे प्रत्येकी ८००, ग्रामीण रुग्णालय माजलगाव, धारुर, पाटोदा, आष्टी येथे प्रत्येकी ५५०, ग्रामीण रुग्णालय तालखेड,चिंचवण, धानोरा, नांदुरघाट, रायमोहा, स्त्री रुग्णालय नेकनुर येथे प्रत्येकी ४००, प्रा. आ. केंद्र ग्रामीण, नागरी रुग्णालये, पोलीस हॉस्पीटल येथे प्रत्येकी ३२० या प्रमाणे उपलब्ध २७८४० कोव्हीशिल्ड लसीचे जिल्हयात वितरण करण्यात आले आहे.
            त्यानुसार दि. २४/५/२०२१ रोजी सर्व प्रा. आ. केंद्र, नागरी रुग्णालये, पोलीस हॉस्पीटल, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय बीड, स्वा.रा.ती. वै. म. वरु अंबाजोगाई येथे ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांसाठी पहील्या डोसकरीता लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहेत. Ezee app वर नोंदणी केलेल्या नागरीकांना SMS / Whatsapp messages दवारे नागरीकांना लसीकरणाकरीता बोलावण्यात येत आहे.
         केज तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात 800 तर प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली माळी,विडा, आडस,युसुफ वडगाव,बन सारोळा,राजेगाव इत्यादी साठी प्रत्येकी 320 तर नांदूर घाट साठी 400 डोस उपलब्ध होणार आहेत.
        दरम्यान ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या जास्तीत जास्त नागरीकांनी Ezee app वर नोंदणी करुन लसीकरणाकरीता टोकन क्रंमाक प्राप्त करुन घ्यावा, टोकन क्रंमाकानुसार प्राप्त मेसेज नुसार लसीकरण करावे, मेसेज नुसार लसीकरणाकरीता न आल्यास परत टोकन क्रंमाक प्राप्त करून घ्यावा लागेल. ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या जास्तीत जास्त नागरीकांनी घरबसल्या Ezee app https:ezee.live/Beed-covid19-registration या लिंकवर वर लसीकरणाकरीता नोंदणी करावी असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
शेअर करा
Exit mobile version