Site icon सक्रिय न्यूज

केज शहरात 55 वर्षीय इसमाचा म्युकर मायकोसिसने मृत्यू……!

केज शहरात 55 वर्षीय इसमाचा म्युकर मायकोसिसने मृत्यू……!
केज दि.२४ – कोरोनाच्या आजार बरा होत आल्यानंतर म्युकर मायकोसिसची लागण झाल्याने शहरातील एका 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.
           शहरातील समर्थ नगर भागात राहणारे मच्छीन्द्र प्रल्हाद राऊत (55) यांना मागच्या पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ते एका खाजगी रुग्णालयात भरती झाले आणि त्यातून ते बरेही होत आले होते. मात्र त्या दरम्यान त्यांना इतरही कांही लक्षणे आढळून आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रेफर केले होते. त्यामुळे त्यांना औरंगाबाद च्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना म्युकरमायकोसिस आजाराची लागण झाल्याने त्यांची प्रकृती जास्तच खालावत गेली आणि त्यातच त्यांचा दि. 23 रोजी दुपारी 12 वाजता मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.
शेअर करा
Exit mobile version