Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात आतापर्यंत 108 पुरुष तर 44 महिलांचा कोरोनाने घेतला बळी…….! 

केज तालुक्यात आतापर्यंत 108 पुरुष तर 44 महिलांचा कोरोनाने घेतला बळी…….! 
केज दि.२५ – मागच्या दिड वर्षांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाने उशिरा एन्ट्री घेतली होती. पहिल्या लाटेत कोरोनाचा संसर्ग जास्त शहरी भागात दिसून येत होता. मात्र दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात घुसलेल्या कोरोनाने सुमारे 129 लोकांचे बळी घेतले असून शहरातील 23 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
              मागच्या दीड वर्षांपासून आजतागायत केज तालुक्यात 7644 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी 6776 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये 152 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले असून यामध्ये 108 पुरुष तर 44 महिला रुग्णांचा समावेश आहे. मध्यंतरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 19 दिवसांचा झाला होता मात्र आता तो कालावधी 30 दिवसांवर आला असून रुग्ण वाढीला थोडा ब्रेक लागला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.7 असून मृत्यू दर हा 2 टक्के आहे.
           दरम्यान सध्या केज शहरातील तीन कोविड सेन्टरवर मिळून 716 रुग्ण उपचार घेत असून मागच्या चार दिवसांपासून दररोज पॉजिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या 100 च्या खाली आल्याने थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्ण संख्येत घट होत असली तरी धोका आणखी टळलेला नसून नागरिकांनी कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करावे. तसेच दुखणे अंगावर न काढता तात्काळ टेस्ट करून उपचार घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version