Site icon सक्रिय न्यूज

अल्पवयीन बालिकेचा बालविवाह थांबविण्यात महिला व बालविकास विभागास यश…..!      

अल्पवयीन बालिकेचा बालविवाह थांबविण्यात महिला व बालविकास विभागास यश…..!      
 अंबाजोगाई दि.२५ – सोमवार (दि. 24) रोजी बीड चे  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. एम. हुंडेकर व अंबाजोगाई शहराचे बालविकास प्रकल्प अधिकारी व्ही. डी. यादव  यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहरातील अमृतेश्वर चौक कमानी जवळ होणा-या बालविवाह रोखण्यात आला.
              रविवार दिनांक 23 मे रोजी प्राप्त गुप्त माहिती नुसार संशयित ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता बालिका हि अल्पवयीन असल्याचे दिसून आले. मुलीचे आई वडील यांच्या कडून बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार त्यांच्या कडून जबाब नोंदवून घेतले. बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अन्वय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार नाही या बाबत सूचना देण्यात आल्या. तसेच पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर चे पोलीस निरीक्षक बी. एन. पवार यांनी पालकांकडून जबाब नामा लिहून घेऊन पालकाला समज दिली.
              तसेच अल्पवयीन बालिकेला बालकल्याण समिती समोर उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी व्ही.एम.हुंडेकर, व्ही.डी. यादव, पोलीस निरीक्षक बी. एन. पवार , पोकॉ के. बी. देशमाने, श्रीमती एस. पी. गोरे , मानवलोक संचलित मनस्विनी प्रकल्पाचे बालाजी वाघमारे, जयश्री शिर्के, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाजीराव ढाकणे, चाईल्ड लाईनचे रामहरी जाधव, अंबाजोगाई चे तालुका  संरक्षण अधिकारी वैष्णव, सहाय्यक संरक्षण अधिकारी प्रदीप मोटेगावकर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
       दरम्यान बीड जिल्ह्यातील ग्राम बाल संरक्षण समिती व वार्ड बाल संरक्षण समितीच्या पदाधिकारी मंडळींने आपल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाहीत यासाठी सतर्क राहावे आणि आपल्या भागातील लोकांना जागृत करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या आशा ढाकणे यांनी केले आहे.
_________________________
शेअर करा
Exit mobile version