Site icon सक्रिय न्यूज

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 13 जुगाऱ्यांवर मोठी कारवाई…….!

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 13 जुगाऱ्यांवर मोठी कारवाई…….!
बीड दि.२५ – गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करत एकत्र येऊन स्वतः च्या फायद्यासाठी तिर्रट नावाचा जुगार खेळणारे 13 जुगारी बीड पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून जेरबंद केले आहे.
               गेवराई तालुक्यातील उमापुर गावातील शेगाव-उमापुर रोड वरील मधुकर कचरु आहेर यांचे शेतात पत्राचे शेड मध्ये दि. 24 रोजी सायंकाळी 10.40 वा. मधुकर कचरू आहेर रा. उमापूर, रमेश भानदास जाधव  रा. उमापूर, नितिन लक्ष्मण चव्हाण रा. ठाकरवाडी, रंजितसिंग चत्रुसिंग चव्हाण रा. उमापूर, अरुण भाऊसाहेब केसभट  रा.जळगाव (गा ), रवी फकीरा बनसोडे रा.उमापूर, संभाजी महादेव आहेर रा. उमापुर, शेषेराव यशवंत कापसे रा.उमापुर, अली सय्यद नजीर रा. उमापुर, अनिल भुजंगराव आहेर रा. उमापुर, अशोक नामदेव केशभट रा.जळगाव (गा), सुरेश केशव खेडकर, रा. उमापुर, शामसुदंर दौल्लतराव पवार रा.बोरीपिंपळगाव हे 13 आरोपी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करून स्वतः चे फायद्यासाठी तिर्रट नावाचा जुगार खेळताना आढळून आले.
          यावेळी जुगाराचे साहीत्य व नगदी- 68,670/-रू. आणि वाहने, मोबाईल हँन्डसेट किमंत अंदाजे 3,58000/- असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरील कारवाई पोलीस विशेष पथकाचे प्रमुख एपीआय विलास हजारे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. पोना संभाजी महादेव भिलारे यांच्या फिर्यादीवरून चकलंबा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि श्री.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ श्री.वणवे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version