नवी दिल्ली दि.25 – उद्यापासून भारतात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम होणार बंद होणार असल्याचं सगळीकडे बोललं जात आहे. नक्की असं काय झालं आहे की ज्यामुळे मोठ्या सोशल मीडिया कंपन्या बंद होणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. यामागे असं कारण आहे की, केंद्र सरकारने नव्या सोशल मीडिया गाईडलाईन्सच्या अमंलबजावणीसाठी फेसबुक, इंस्टग्राम, ट्वीटर, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया अॅप्सला दिलेली मुदत मंगळवारी रात्री संपत आहे.
केंद्र सरकारने आणलेली नवीन मार्गदर्शक तत्व लागू न केल्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली जाईल. केंद्र सरकारने नवीन नियमावलीला मंजूरी देण्यासाठी दिलेली अंतिम तारीख आज समाप्त होत आहे. अशात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर 26 मे 2021 पासून निर्बंध लागू होतील.सरकारने या सर्वांना तीन महिन्यांनी मुदत दिली होती. पण अनेकांनी त्यासाठी मुदत वाढ मागितल्याची चर्चा आहे. पण अजूनही सरकारने त्यांना मुदत वाढ दिल्याची कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली लागू करत असल्याची घोषणा 25 फेब्रुवारी 2021 ला केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद तसंच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती.
दरम्यान, देशभरात सर्वांचं लक्ष लागून आहे ते म्हणजे खरंच भारतात उद्यापासून सोशल मीडिया कंपन्या बंद राहणार आहेत की नाही?, मात्र खरंच जर बंद झाल्या तर नागरिकांना अनेक समस्या येेण्याची शक्यता आहे.