केज दि.28 – दवाखान्यातून येतो असा बहाणा करून सालगडी शेत मालकाची दुचाकी घेऊन पसार झाल्याची घटना केज तालुक्यातील भाटुंबा येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
भाटुंबा येथील शेतकरी माधव सखाराम धपाटे यांच्या शेतात सालगडी म्हणून ज्ञानेश्वर श्यामराव चव्हाण ( रा. ब्राम्हणवाडा पो. सावणा ता. शेनगाव जि. हिंगोली ) हा कामाला होता. २० मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर चव्हाण याने दवाखान्यात जाण्याचा बहाणा करून शेतमालक माधव धपाटे यांची दुचाकी मागितली. त्यांनी दवाखाण्यात जाण्यासाठी दुचाकी ( एम. एच. ४४ एच. ८२५८ ) ज्ञानेश्वरला दिली. तो दुचाकी घेऊन पसार झाला अन परतलाच नाही. त्याची परत येण्याची सहा दिवस वाट पाहून २७ मे रोजी माधव धपाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सालगडी ज्ञानेश्वर चव्हाण याच्याविरुध्द युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पांडुरंग वाले हे पुढील तपास करत आहेत.