Site icon सक्रिय न्यूज

दहावीचा निकाल जून अखेर पर्यंत तर अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागणार……!

दहावीचा निकाल जून अखेर पर्यंत तर अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागणार……!

मुंबई दि.28 –  राज्यात कोरोनाची दुसरी लाटेचा हाहाकार पाहायला मिळत आहे. त्यामुळे दहावीची परीक्षा कशी होणार, निकाल कसा लागणार, त्यासह अकरावीचे प्रवेश कसे होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अकरावी प्रवेशप्रक्रिया कशी होईल याची माहिती त्यांनी दिली.

शालेय शिक्षण मंत्री वर्षागायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत. दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू असं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील, असं म्हटलं आहे.

इयत्ता 11 वीच्या प्रवेशाबाबत ऑप्शनल सीईटी घेण्यात येणार आहे. या प्रवेश परीक्षा राज्य मंंडळाच्या दहावी अभ्यासक्रमावर असेल. त्यासाठी दोन तासाचा वेळ, ओएलआर स्वरुप असेल. या ११ वी प्रवेश सामाईक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. ११ वी प्रवेशाबाबत एकवाक्यतेसाठी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

CET दिलेल्यांना ११ वी प्रवेशाला प्राधान्य देणार आहे. त्यानंतर रिक्त जागांबाबत विचार केला जाईल. राज्यातील इयता 10 परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यासाठी हे धोरण तयार करण्यात आलं  आहे. 11 वी परीक्षेसाठी पर्यायी सीईटी घेण्यात येणार इच्छुक विद्यार्थ्यांना ती देता येईल. ही 100 गुणांची बहुपर्यायी ही परीक्षा असेल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

 

दहावीच्या विद्यार्थ्यांचं अंतर्गत मूल्यांकन नेमकं कसं होणार?

दहावीच्या वर्षातील लेखी मूल्यमापनला 30 गुण असतील, दहावीचे गृहपाठ, तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत 20 गुण असतील तसंच नववीच्या विषयानिहाय गुण याला 50 गुण असतील. असं एकूण 100 गुणांचं मूल्यमापन असेल.

शेअर करा
Exit mobile version