Site icon सक्रिय न्यूज

11 कोटी 80 लाख विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे येणार……!

11 कोटी 80 लाख विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे येणार……!

नवी दिल्ली दि.29 – केंद्र सरकारने मध्यान्न पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणानुसार  पैसे देण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याला मंजूरी दिली. यानुसार आता 11 कोटी 80 लाख विद्यार्थ्यांना विशेष मदत मिळणार आहे. यासाठीच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे देशात सरकारी आणि अनुदानित शाळांमधील 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

                       विद्यार्थ्यांना घरीच पोषण आहार मिळावा म्हणून मध्यान्न पोषण आहार योजने अंतर्गत हे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात येणार आहेत. यामुळे मुलांमधील पोषणाचा स्तर सुरक्षित राहिल. तसेच त्यांना कोरोनाचा सामना करताना रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासही उपयोग होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलंय. केंद्र सरकारने या योजनेसाठी राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना जवळपास 1200 कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्याचं जाहीर केलंय.

                   दरम्यान केंद्र सरकारच्या या योजनेचा देशभरातील 11.20 लाख सरकारी आणि अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गातीलर जवळपास 11.8 कोटी विद्यार्थ्यांना लाभ मिळेल.

शेअर करा
Exit mobile version