Site icon सक्रिय न्यूज

गॅस लिकेज होऊन घराला आग, सासू सुनासह मुलगी जखमी……!

गॅस लिकेज होऊन घराला आग, सासू सुनासह मुलगी जखमी……!
केज दि.28 – तालुक्यातील सोने सांगवी येथे एका घरातील गॅस लिकेज झाल्याने घराला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून सासू सुनासह एक मुलगी जखमी झाली आहे.
           सोने सांगवी येथे दि.29 रोजी सकाळी अंदाजे दहा ते अकरा च्या दरम्यान विष्णू बाजीराव कणसे यांच्या घरातील गॅस सिलेंडर मधून गॅस गळती होऊन पेट घेतला. सदरील प्रकार घडल्याने घरातील विष्णू कणसे यांच्या पत्नीने व सूनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही. तर यामध्ये त्या दोघींसह एक मुलगी जखमी झाल्याने तिघीनाही उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
         दरम्यान सदरील प्रकार नेमका कसा घडला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सदरील घटनेत नगदी रकमेसह घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती महसूल विभागाला दिली असून संबंधित तलाठी व मंडलाधिकारी हे घटनास्थळी रवाना झाले आहेत.
शेअर करा
Exit mobile version