बीड दि.30 – जिल्ह्यात लस उपलब्ध असूनही नागरिकांकडून ऑनलाइन नोंदणीमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने लसीकरण मोहीम मंदावली आहे.त्यामुळे गावागावात जाऊन 45 वर्षे वयापुढील नागरिकांची ऑनलाइन नोंदणी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी काढले आहेत.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लसीकरण करणे हा एक महत्वाचा टप्पा असून त्यानुसार प्रा.आ. केंद्रास्तरावर लसीकरणाची कार्यवाही सुरू आहे. त्याअनुषंगाने लसीकरणाकरिता नागरिकांची नोंद करण्याकरिता जी कार्यपध्दती पूर्वी सुरू होती त्यामध्ये बदल करून http://ezee.live/ Beed-covid19-reistration या लिंकद्वारे / Needly app द्वारे लसीकरणासाठी नोंद करणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये अपेक्षित गती साध्य करण्यासाठी खालील प्रमाणे नवीन कार्यपध्दती निर्धारित करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने बीड जिल्हयामध्ये लसीकरणाची गती वाढविण्याकरिता गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये १०० कुटुंबाकरिता एक या प्रमाणे त्याच गावातील शिक्षकांचे आदेश निर्गमीत करुन त्यांच्यावर ४५ वर्षावरील सर्व नागरिकांची नोंद http://ezee.live/Beed-covid19-reistration या लिंकद्वारे / Needly app द्वारे नोंदविण्याची जबाबदारी सोपविण्यात यावी. ज्या गावांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असेल त्या ठीकाणी लगतच्या गावातील इतर शिक्षकांची नियुक्ती करावी. या करिता गट शिक्षणाधिकारी यांची मदत घेऊन गट शिक्षणाधिकारी व गट विकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरिने दिनांक १ जून २००१ पूर्वी आदेश निर्गमीत करावेत.तर सदर आदेशामध्ये संबंधित शाळांचे मुख्याधापक यांच्यावर पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच संबंधित विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्र प्रमुख
यांच्यावर अनुक्रमे तालुकास्तरावरील व केंद्रीयस्तरावरील पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात यावी, जिल्हास्तरावर यांचे सनियंत्रण शिक्षणाधिकारी प्राथमीक हे करतील.
या बाबतीत जिल्हयातील सर्व गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षण केंद्र प्रमुख यांचे मास्टर ट्रेनर म्हणून Online प्रशिक्षण दिनांक २ जून २००१ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात येत असून त्याची लिंक नियोजित वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल. सदर प्रशिक्षणा नंतर गट शिक्षणाधिकारी यांनी त्यांचे स्तरावर दिनांक २ जून २००१ रोजी दुपारी Online प्रशिक्षण आयोजित सर्व संबंधित शिक्षकांना http: //ezee.live/Beed-covid 19-reistration या लिंकद्वारे / Needly app द्वारे नांव नोंदणीचे प्रशिक्षण देण्यात यावे. प्रशिक्षणाअंती सर्व शिक्षकांनी दिनांक ३ जून २०२१ पासून नेमून दिलेल्या गावामध्ये जावून प्रत्यक्षात नाव नोंदणीचे कामकाज सुरु करावे व केलेल्या कामकाजाचा लेखी अहवाल केंद्र प्रमुख यांच्या मार्फत गट शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावा. गट शिक्षणाधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मदतीने त्यांना उपलब्ध करून दिलेल्या Google Sheet वर माहिती upload करावी असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.