गेवराई दि.2 – तालुक्यातील मिरगाव येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह तिची मुलगी आणि पुतणीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली.
रंजना गोडबोले (३०), अर्चना गोडबोले (१०) आणि शितल गोडबोले (११) अशी मयतांची नावे आहेत. यातून आरती गोडबोले ही मुलगी बचावली आहे. घटनास्थळी पंचायत समिती सदस्य पुजा मोरे यांनी भेट दिली.
घटनेची महिती मिळताच,पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नेमकं काय घडलं ? महिला आणि दोन मुली नेमक्या कशा बुडाल्या ? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र एकाच घरातील तिघींचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.गोडबोले कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.