केज दि.५ – आपण समाजात राहतो त्या समाजासाठी आपलं आणखी देणं लागतं” याच गोष्टी अमलात आणत, अष्टविनायक मित्र मंडळाने गेल्या चार वर्षा पूर्वी पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड केली होती. आज त्या वृक्षांची उंची डोळ्यात पाहण्यासारखी झाली आहे.
दरम्यान यात एक वेगळा आनंद परिसरातील लोकांमध्ये आहे. त्यामुळे अष्टविनायक मित्र मंडळने झाडे लावा झाडे जगवा हा संदेश खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवला असल्याचे दिसून येते. तसेच येणाऱ्या काळात अष्टविनायक मंडळाकडून शहरातील समर्थ नगर भागात आणखीन वृक्षरोपण अखंड सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. वृक्ष लागवडीनंतर आज समर्थ नगर परिसरात एक नैसर्गिक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.