Site icon सक्रिय न्यूज

ठरलं…….सोमवारपासून बीड जिल्ह्यात धावणार लालपरी, प्रवाशांची मोठी सोय…….!

ठरलं…….सोमवारपासून बीड जिल्ह्यात धावणार लालपरी, प्रवाशांची मोठी सोय…….!

बीड दि.५ – कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मागील दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून राज्यात एसटी बस सेवा बंद होती.मात्र आता कोरोनाची रुग्ण संख्या घटली असल्याने सोमवारपासून (दि.७) पुन्हा एकदा लालपरी प्रवाशांना घेऊन धावणार आहे. या संदर्भात विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी माहिती दिली आहे. 

                   सोमवारी सकाळपासून एसटी बसला राज्यांतर्गत प्रवासासाठी मुभा देण्यात आली असून बीड जिल्ह्यातील सर्व आगारातून बस सेवा पूर्वीप्रमाणे सुरु होणार आहे.यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून बसमध्ये मास्क वापरणे प्रत्येकाला अनिवार्य असणार आहे.

यामध्ये बीड आगारातून परळी, नांदेड,परभणी, अंबाजोगाई, लातूर, औरंगाबाद,जालना,सोलापूर,पुणे,मुंबई तर परळी येथून बीड,परभणी,लातूर,अंबाजोगाई,नांदेड,सोनपेठ तसेच धारूर आगारातून बीड,अंबाजोगाई,केज,तेलगाव,पुणे इथपर्यंत. माजलगाव आगारातून लातूर,परळी,परभणी,नांदेड,सोलापूर,कोल्हापूर,बीड-मुंबई,गेवराई,आष्टी पर्यंत बस धावेल. गेवराई आगारातून माजलगाव,परभणी,नांदेड,शेगाव,पुणे,जालना,औरंगाबाद तर पाटोदा आगारातून पुणे,बीड,परळी,मुंबई पर्यंत गाड्या धावतील. तसेच आष्टी आगार-पुणे (स्वारगेट),नगर,मुंबई इथपर्यंत तर अंबाजोगाई आगारातून बीड,परळी,औरंगाबाद,लातूर,अहमदनगर,पुणे,धारूर इत्यादी ठिकाणी बस प्रवाशांना घेऊन जातील.

शेअर करा
Exit mobile version