Site icon सक्रिय न्यूज

विनायक मेटे यांच्यासह हजारो मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल……!

विनायक मेटे यांच्यासह हजारो मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल……!

बीड दि.६ – पोलिसांनी परवानगी नाकारूनही बीडमध्ये मोर्चा काढल्याबद्दल शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांसह तब्बल अडीच ते तीन हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विनायक मेटे यांनी ठाकरे सरकार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. अशोक चव्हाण यांच्यासारखा नाकर्ता माणूस आजपर्यंत झालेला नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा बापट आयोगाच्या शिफारशी फेटाळण्याची मागणी आम्ही केली होती. पण त्याकडे अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केलं. 2014 ला सुद्धा जे आरक्षण दिलं ते ही चुकीचं दिलं, त्याची फळं आज आपण भोगतोय.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षण अतिशय चांगलं होतं. पण अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे घालवलं, असा घणाघाती आरोपही मेटे यांनी यावेळी केलाय. इतकच नाही तर मराठा आरक्षण, मराठा समाजाला सवलती आणि अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्या. त्यासाठी 5 जुलैपर्यंतची वेळ देतो. नाहीतर 7 जुलैला होणारं पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही असा इशाराही दिला आहे.

शेअर करा
Exit mobile version