Site icon सक्रिय न्यूज

कळंब मार्केट यार्डात झालेल्या खुन प्रकरणात दोघे जेरबंद..……!

कळंब मार्केट यार्डात झालेल्या खुन प्रकरणात दोघे जेरबंद..……!
कळंब दि.7 – शहरातील मार्केट यार्डमध्ये आडतीवर काम करणाऱ्या वॉचमनचा गोळ्या झाडून खून केल्याचा प्रकार 5 जून रोजी उघडकीस आला होता. या मध्ये दोघा आरोपींना अटक करण्यात आले असून न्यायालयात हजर केले असता दोघांना ११ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
                 कळंब येथील मार्केट यार्ड भागात अजय साहेबराव जाधव यांचा आडत व्यवसाय आहे. याच आडत दुकानाच्या वरच्या मजल्यावर जाधव कुंटूब वास्तव्य करत आहे. जाधव यांच्या आडतीवर मच्छिंद्र छगन माने (रा. फरिदनगर डिकसळ ) हे वॉचमन म्हणून कार्यरत होते. मात्र शुक्रवारी रात्री अचानक एकजण भिंतीवरून उडी मारून आला आणि त्याने मानेला मारहाण करायला सुरुवात केली. दोघांमध्ये झटापट झाली असता आरोपीने मानेची गोळ्या घालून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली.
                           दरम्यान कळंब पोलिसासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी हे विविध अंगाने या प्रकरणाचा तपास करत होते. शेवटी गुन्हे शाखेचे पोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि पांडुरंग माने, पोउनि भुजबळ, पोकों काझी, सय्यद, अमोल चव्हाण, जाधवर, ढिगारे, मलपिल्ले, सजे, सावंत यांच्या
पथकाने शाम उर्फ राजाभाऊ पवार (वय २३, रा. केज, जि. बीड), गणेश सुबराव पवार (वय १९, रा. कल्पना नगर, पारधी पिढी, कळंब) या दोघांना मोठ्या सिथापीने पकडले. दोघांना कळंब न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक ११ जुन पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शेअर करा
Exit mobile version