Site icon सक्रिय न्यूज

केस केल्याच्या कारणा वरून एकाचे कुऱ्हाडीने डोके फोडले…….! 

केस केल्याच्या कारणा वरून एकाचे कुऱ्हाडीने डोके फोडले…….! 
केज दि.७ – कोर्टात केस का केली अशी भांडणाची कुरापत काढून एका शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाड मारून डोके फोडत जखमी केले. लाथाबुक्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील साळेगाव येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात तीन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
                   साळेगाव येथील सुधाकर शिवराज पारखे ( वय ५५ ) हे ६ जून रोजी सकाळी १० ते १०.१५ वाजेच्या सुमारास शेतात असताना सतिष उर्फ बापू धोंडीराम गित्ते, ज्योती धोंडीराम गित्ते, आशाबाई धोंडीराम गित्ते, शितल सतीश गित्ते हे चौघे संगनमत करून आले. त्यांनी आमच्या विरुद्ध कोर्टात केस का केली ? अशी भांडणाची कुरापत काढून सुधाकर पारखे यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण करीत मुक्कामार दिला. तर सतिष गित्ते याने हातातील कुऱ्हाड सुधाकर यांच्या डोक्यात मारून डोके फोडून जखमी केले. जीवे मारण्याची धमकी ही दिली. अशी फिर्याद सुधाकर पारखे यांनी दिल्यावरून सतिष उर्फ बापू गित्ते, ज्योती गित्ते, आशाबाई गित्ते, शितल गित्ते या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमोल गायकवाड हे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version