Site icon सक्रिय न्यूज

ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ८८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला…..!

ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ८८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला…..!
अंबाजोगाई दि. ८ (पांडुरंग केंद्रे) पोस्ट कोवीड उपचारांमध्ये म्युकरमायकोसिस या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयास पालकमंत्री ना. धनंजय मुंडेंनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मायक्रो डिब्रायडर एंडोस्कोपी युनिट खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर १९ सिरिंज इन्फ्युजन पंप खरेदी करण्यासाठी असे मिळुन ८८लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
              म्युकरमायकोसिस रुग्णावर उपचार करताना अवश्यक एंडोस्कोपी सर्जरी करण्यासाठी मायक्रो डिब्रायड एंडोस्कोपी सर्जरी करण्यासाठी मायक्रो डिब्रायडर एंडोस्कोपी युनिट अत्यंत लाभदायक असुन याची आंतरराष्ट्रीय बाजारात ४२,७८२युएस डाॅलर्स इतकी किंमत आहे. युनिटसह ९,३६ लाख रुपये किंमतीचे १९ इन्फ्युजन पंप खरेदीसाठी एकुण ८८ लाख रुपये निधी जिल्हा नियोजन मधुन उपलब्ध करून दिला असल्याची  माहिती स्वरातीचे अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी दिली.
                          अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिस च्या ९० रुग्णांवर ११५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असुन बीडसह नांदेड, उस्मानाबाद, जालना परभणी आदि जिल्ह्यातुन देखील या आजाराचे रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी शस्त्रक्रिया करणारे स्वाराती हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे. डॉ प्रशांत देशपांडे, डॉ. सुधीर भिसे यांच्यासह या विभागातील सर्व निवासी डॉक्टरांच्या नेतृत्वात म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार प्रक्रिया अविरतपणे सुरू आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील या सर्व टिमचे ना धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले.
                       दरम्यान ना. धनंजय मुंडे यांनी एंडोस्कोपी सायनो सर्जरीसाठी मायक्रो डिब्रायडर एंडोस्कोपी युनिटसारखे आधुनिक उपकरणे प्राप्त करून दिल्यामुळे म्युकरमायकोसिस रुग्णांवरील उपचारांना आणखी बळकटी व वेग येणार असल्याचे डॉ. सुक्रे यांनी म्हटले आहे.
शेअर करा
Exit mobile version