Site icon सक्रिय न्यूज

तात्पुरता वाहतुकीसाठी बनवलेला पूल गेला वाहून…… परळी अंबाजोगाई वाहतूक ठप्प……!

तात्पुरता वाहतुकीसाठी बनवलेला पूल गेला वाहून…… परळी अंबाजोगाई वाहतूक ठप्प……!

परळी दि.९ – पहिल्याच पावसात बीड जिल्ह्यातील परळी-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गाच्या चालू कामाचा खेळ खंडोबा झाला आहे. परळी शहराजवळील कन्हेरवाडी येथे पुलाचे काम सुरू आहे. तात्पुरता वाहतुकीसाठी बनवलेला पुल बुधवारी (दि.९) पाण्याने वाहून गेला आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.

                  परळी तालुक्यात आज जोरदार पावसाने हजेरी लावताच परळी ते अंबाजोगाई मार्गावरील पुलच वाहून गेला. त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आता या मार्गावरून प्रवास करता येत नाही. आता वाहन धारकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडी निर्माण झाली असून दुसरीकडे पूल वाहून गेलेल्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती.
तर पावसाचे पाणी घाटातून शेतकऱ्यांच्या शेतात नदीला आल्याने हा पूल वाहून गेला आहे. यामुळे या राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहनाच्या जवळजवळ दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. दरम्यान नंदागौळ कनेरवाडी घाट परिसरात असलेल्या शेतीचेही फार मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
             दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून परळी आंबेजोगाई रस्त्याचे काम रखडले आहे. या रखडलेल्या कामामुळे अपघात घडून अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेअर करा
Exit mobile version