Site icon सक्रिय न्यूज

बापलेकासह तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू……!

बापलेकासह तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू……!

गेवराई दि.१० – तालुक्यातील दैठण येथील एका शेततळ्यात बूडुन बाप-लेकासह भाच्याचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.१०) दुपारी ५ च्या सुमारास घडली आहे.या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

                  सुनिल जग्गनाथ पंडित (वय-४०) त्यांचा मुलगा राज पंडित (वय-१२) व सुनील पंडित यांचा भाचा शेततळ्यावर गेले होते.यावेळी राज आणि सुनील यांचा भाचा पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले असता ते दोघे पाण्यात बुडू लागले.हे पाहून सुनील पंडित यांनी शेततळ्यात उडी मारून या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही पोहता येत नसल्याने या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला.
         दरम्यान गेवराई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण दैठणवर शोककळा पसरली आहे.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version