केज दि.१२ – बीड जिल्ह्यात वाड्या वस्त्यावर ट्रान्सफॉर्मर द्या, लोकांना विजेची सुविधा उपलब्ध करून द्या मात्र आणि वीज बिलाची अंदाजे आकारणी करू नका. रिडींग प्रमाणे बील दिले पाहिजे. लोकांच्या तक्रारी येता कामा नयेत अशा शब्दात काँग्रेसचे नेते व राज्याचे ऊर्जामंत्री ना.नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या ते शुक्रवारी संध्याकाळी माजी मंत्री अशोक पाटील यांच्या शिवनेरी बंगल्यावर भेट दिली यावेळी ते बोलत होते.
शुक्रवारी रात्री ८ च्या दरम्यान श्री.राऊत यांनी माजी मंत्री अशोक पाटील व माजी खासदार रजनीताई पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी ते जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटले. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेक गावात नविन ट्रान्सफॉर्मर, सिंगल फेज चे नवीन वस्त्यांवर ट्रान्सफॉर्मर द्यावेत अश्या मागण्यांचे निवेदन दिले. यावर ना.राऊत यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन ही कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. यावेळी माजी मंत्री अशोक पाटील, माजी खा. रजनीताई पाटील, आ.संजय दौंड, नगराध्यक्ष आदित्य पाटील, राजेसाहेब देशमुख, राहुल सोनवणे, हनुमंत मोरे, लालासाहेब पवार, पशुपतीनाथ दांगट, प्रविणकुमार शेप, हाजी मौला सौदागर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे, दलिल इनामदार, कबिरोद्दीन इनामदार, कपिल मस्के, अमर पाटील, ईश्वर शिंदे, गणेश गंगणे, तसेच महावितरणचे मुख्य अभियंता घोलप, कार्यकारी अभियंता चाटे, उप अभियंता आंबेकर, नायब तहसिलदार सचिन देशपांडे, शिवाजी शिंदे, प्रविण देशमुख, शिवाजी सोमवंशी, निलेश शिंदे, संजय गांधी समितीचे सदस्य संतोष सोनवणे, प्रताप मोरे, युवक काँग्रेसचे सुजित सोनवणे, सचिन रोडे, चेतन नेहरकर, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
——-–———————-———-–—–
अशोक पाटलांच्या मागणीवर शिक्कामोर्तब करून ग्रीन बेल्ट मधील विजेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन !
यावेळी माजी मंत्री अशोक पाटील यांनी ना.नितीन राऊत यांच्याकडे ग्रीन बेल्ट मधील शेतकऱ्यांना कमी दाबाने वीज मिळत असल्याने धनेगाव, कुंबेफळ, आपेगाव व जवळबन या वीज उपकेंद्रांची क्षमता 5 KA ने वाढवावी जेणे करून या भागातील शेतकऱ्यांना सम दाबाने वीज उपलब्ध होईल. तसेच पाटोदा-देवळा व सोमनाथ बोरगाव हे वीज उपकेंद्र मंजूर आहेत त्यांना बजेट उपलब्ध करून घ्यावे जेणे करून या उपकेंद्रांचे काम लवकर सुरू होईल. अशी मागणी केली यावर ना.नितीन राऊत यांनी मागणीची दखल घेत याची आपण तात्काळ अंमलबजावणी करू असा विश्वास दिला.
————————————————
केज शहरातील बिलांची फेरतपासणी करा- आदित्य पाटील
यावेळी आदित्य पाटील यांनीही केज शहरात मागील काही महिन्यात वाढीव बील येत असून हे बील कमी करावेत अशी मागणी केली. यावर ना.राऊत यांनी तात्काळ शहरातील बिलांची फेरतपासणी करा असे आदेश उप अभियंता राजेश आंबेकर यांना दिले.
———————————————–