Site icon सक्रिय न्यूज

सीआरपीएफ मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू, इच्छुक उमेदवारांना नौकरीची संधी…..!

सीआरपीएफ मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू, इच्छुक उमेदवारांना नौकरीची संधी…..!

नवी दिल्ली दि.१२ – गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन  किंवा कडक निर्बंध लागू केले आहेत. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. परिणामी अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. अनेकांच्या नोकऱ्या  गेल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. त्याचसोबत नुकतेच शिक्षण पूर्ण झालेले अनेक तरुण आणि नोकऱ्या गेल्याने बेरोजगार झालेले तरुण सध्या नव्या रोजगारसंधीच्या शोधात आहेत. त्यातही शासकीय नोकऱ्यांना अशा युवकांकडून जास्त प्राधान्य दिले जात आहे. सीआरपीएफने अशा इच्छूक उमेदवारांसाठी नोकरीची विशेष संधी उपलब्ध करुन दिली आहे. सीआरपीएफने (CRPF) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी ही एक सुसंधी आहे, असेच म्हणावे लागेल.

          केंद्रीय राखीव पोलिस दल म्हणजेच सीआरपीएफने नोटीफिकेशन जारी करत विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. सीआरपीएफ ज्या पदांची भरती करणार आहे, त्यामध्ये मुख्याध्यापिका, आया, शिक्षक, फिजीओथेरपिस्ट, न्युट्रीशनिस्ट या पदांचा समावेश आहे. या पदांकरिता इच्छुक उमेदवारांना crpf.gov.in या अधिकृत वेबसाईटवर (Website) जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 25 जून 2021 पर्यंत सुरु असेल.वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता भिन्न आहे. यात प्रामुख्याने इयत्ता 5 वी पास, पदव्युत्तर पदवी, पीजी डिप्लोमा, एम.एससी, पदवी, बीएड यांचा समावेश आहे. शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन वाचावे.या पदांसाठी 18 ते 40 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. SC/ST/OBC/PWD/PH या घटकांमधील इच्छुक उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

दरम्यान अर्ज प्रक्रियेला सुरुवात – 11 जून 2021 पासून सुरू झाली असूनअर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – 25 जून 2021आहे.या पदांसाठी इच्छूक उमेदवार निःशुल्क अर्ज दाखल करु शकतील. उमेदवारांना किमान वेतन 6500 ते 10000 रुपये असेल. विविध पदांचे वेतन किती आहे हे तपासण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी नोटिफिकेशन पाहावे. इच्छूक उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज दाखल करु शकतात. या पदांसाठी जॉब लोकेशन उत्तर प्रदेश असेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवारांना crpf.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

शेअर करा
Exit mobile version