केज दि.१२ – ज्या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते त्या स्वरूपाचा पाऊस आज दि.१२ रोजी केज शहर तसेच परिसरात कोसळला.
पुरेश्या पावसा अभावी अद्याप बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या नाहीत.दमदार पाऊस पडल्याशिवाय शेतकरी पेरणीला लागत नसल्याने जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. त्याप्रमाणे आज पावसाने हजेरी लावली असून शेतकरी सुखावला आहे. सायंकाळी 5 च्या सुमारास सुरू झालेला जोरदार पाऊस किमान पाऊण तास बरसत होता. वादळी वारे आणि मेघ गर्जनेसह सुरू झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच झाल्याचे दिसून आले.