Site icon सक्रिय न्यूज

‘या’ नागरिकांना घरी जाऊन दिली जाणार लस, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा…..!

‘या’ नागरिकांना घरी जाऊन दिली जाणार लस, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा…..!

जालना दि.१२ – संपूर्ण देशभरात सध्या लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. देशातील सर्वाधिक लसीकरण केलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राचं नाव समोर आलं आहे. त्यातच आता घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ते जालना दौऱ्यावर असताना त्यांनी याबाबत मोठी घोषणा केली.

महाराष्ट्रात आता घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार असून या मोहिमेचा लाभ सर्व नागरिकांना मिळणार नसून जे लोक आजारपणामुळे किंवा इतर व्याधींमुळे घरातून बाहेर पडू शकत नाहीत, अशा लोकांना घरोघरी जाऊन लस देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील जे लोक घराबाहेर पडू शकत नाहीत किंवा ज्यांना काही आजार आहेत, अशा लोकांचं लसीकरण यापुढे घरीच करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना लसीकरण केंद्रावर जाण्याची गरज नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या महाराष्ट्रात दोन कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे.

http://sakriynews.com/7579/

http://sakriynews.com/7574/

 

शेअर करा
Exit mobile version