Site icon सक्रिय न्यूज

मास्कच्या संपर्कात येताच कोरोना विषाणू निष्क्रीय होणार……!

मास्कच्या संपर्कात येताच कोरोना विषाणू निष्क्रीय होणार……!

पुणे दि.१५ – कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात अनेकांचे प्राण गेले आहेत. कोरोना विरूद्धच्या लढ्यात अनेकांनी नवनवीन प्रयोग केले. इंजिनिअर्स आणि स्टार्टअप कंपन्यांनी अनोखे प्रयोग करत आरोग्य विभागाची मोठी मदत केली आहे. कोरोना असल्यानं सर्वांना बचावासाठी मास्क घालण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यानंतर देखील काही जणांना कोरोनाची लागण झाली. पण आता कोरोनाला मास्कच मारणार असल्यानं सर्वांची चिंता दूर होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील थिंकर टेक्नॉलॉजिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप कंपनीनं एक अनोखा मास्क बनवला आहे. हा मास्क घातल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता नाही, असा दावा या कंपनीनं केला आहे. या मास्कच्या संपर्कात येताच कोरोना विषाणू निष्क्रीय होऊन जाईल. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी हा मास्क खूपच महत्वाचा ठरु शकतो, असंही कंपनीनं म्हटलं आहे. या मास्कची चर्चा आता सर्वत्र चालू झाली आहे. थ्रीडी-प्रिंटिंग आणि औषधांच्या मिश्रणातून एक असा मास्क तयार केला आहे. जो आपल्या संपर्कात येणाऱ्या व्हायरल विषाणू म्हणजेच विषाणूंना निष्क्रीय करुन टाकतो. तयार केलेल्या मास्कवर विशिष्ट प्रकारे औषधाचा लेप लावण्यात येतो. त्यामुळे विषाणू मास्कवरच नष्ट होतात, असं कंपनीनं म्हटलं आहे. विज्ञान आणि प्रौद्योगिक विभागाने या मास्कची दखल घेतली आहे.

दरम्यान, या लेपमध्ये सोडियम ओलेफिन सल्फोनेटचं मिश्रण वापरण्यात आलं आहे. याचा वापर साबणामध्ये केला जातो. विषाणू या लेपच्या संपर्कात आल्यानंतर कोरोना विषाणू नष्ट होऊन जातात. सध्याचे मास्क कमी गुणवत्तेचे आहे, या मास्कवर आणखी प्रयोग करण्यात येत असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.

शेअर करा
Exit mobile version