बीड दि.१५ बीडच्या तहसिल कार्यालयातील पुरलठा निरीक्षक असलेल्या रविंद्र ठाणगे याला दहा हजाराची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. तहसिल कार्यालयातच हा सापळा रचण्यात आला. ठाणगेचा पैसे घेतानाचा व्हिडीओ यापुर्वी व्हायरल झाला होता.
बीड तहसिल कार्यालयात आल्या पासुन वादग्रस्त असलेल्या रविंद्र ठाणगे विरोधात यापुर्वी अनेक तक्रारी होत्या. मात्र प्रशासन कारवाई करित नव्हते. मंगळवारी सकाळी अखेर एसीबीने च तहसिल कार्यालयात जाळे टाकून ठाणगेला पकडले आहे. दहा हजाराची लाच घेताना त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपाधिक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दहा हजारांची लाच घेताना पुरवठा निरीक्षक चतुर्भुज……!

Anti Corruption concept. Man gives an envelope with money another man. Businessman giving a bribe. Cash in hands of businessmen during corruption deal. Vector illustration in flat style. EPS 10.